बिग बॉस

Big Boss Marathi 5: बिग बॉसमधील माझा प्रवास इथपर्यंतच! अशी पोस्ट शेअर करतं वर्षा ताईंचा बिग बॉसला निरोप

बिग बॉसच्या घरात नुकतेच फिनालेमधले मीडविक एलिमिनेशन झाले आहे. या एलिमिनेशनमध्ये महाराष्ट्राची वंडरगर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा उसगावकर यांचे एलिमिनेशन झाले आहे.

Published by : Team Lokshahi

बिग बॉसचा फॅनबेस आता संपुर्ण राज्य भरातच नाही तर संपूर्ण जग भरात पाहायला मिळत आहे. बिग बॉस आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. टीव्हीवर पाहिला जाणारा बिग बॉस आता ओटीटीवर देखील धुमाकूळ घालताना दिसून येत आहे. तर मराठी बिग बॉस सिजन 5 चा एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण झालेला पाहायला मिळत आहे. कदाचित हे सगळ आत असलेल्या सदस्यांमुळे देखील असू शकतं. बिग बॉस मराठीच्या आतापर्यंतच्या सिजनमध्ये बिग बॉस सिजन 5 चा टीआरपी आणि चाहतावर्ग हा खूप मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहे. बिग बॉसचा क्रेज संपूर्ण जगभरात पाहायला मिळतो.

हिंदी बिग बॉस असो किंवा मराठी बिग बॉस पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी सज्ज असतात. बिग बॉसच्या घरात नुकतेच फिनालेमधले मीडविक एलिमिनेशन झाले आहे. या एलिमिनेशनमध्ये महाराष्ट्राची वंडरगर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्षा उसगावकर यांचे एलिमिनेशन झाले आहे. फिनालेच्या अंतिम टप्प्यात येऊन वर्षा उसगावकर यांना बिग बॉसचे घर सोडावे लागत आहे.

यादरम्यान वर्षा उसगावकर यांनी एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्या म्हणाल्या आहेत, प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा नाही, तर स्वतःला शोधण्याचा आहे आणि मी #BiggBoss च्या प्रवासात केवळ स्वतःला नव्याने ओळखले नाही, तर मी आपले सामर्थ्य, धैर्य आणि संघर्ष यांचा अनुभव घेतला. या प्रवासात मी अनेक आव्हानांचा सामना केला, नवीन मित्र बनवले आणि माझ्या सच्च्या व्यक्तिमत्त्वाला वाव दिला. माझा हा अनुभव दर्शवतो की प्रत्येक प्रवास आपल्याला एक नवीन शिकवण देतो आणि आपल्याला अधिक बलवान बनवतो. तुमची ताई, तुमची वर्षा, तुमची #WonderGirl या शो मधुन तुमचा निरोप घेत आहे. पण मनोरंजनाचा हा घेतलेला वसा कायम पुढे चालत राहील माझ्या प्रिय प्रेक्षकांना प्रेम आणि फक्त प्रेम.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी